बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

स्वस्तात मस्त फोनची दुनिया............



मोबाइल घ्यायचा म्हटलं की त्याच्या स्पेसिफिकेशन्सच्याही आधी आपण आपले बजेट ठरवतो आणि मग त्यानुसार मोबाइलची निवड करीत असतो. असे करत असताना आपल्याला परवडणाऱ्या मोबाइल्सची यादीच आपल्यासमोर येते. पण त्याचा ब्रँड नावाजलेला नसतो. अशावेळी आपल्या मनात धस्स होतं आणि हा फोन घ्यायचा की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. फोन्सची निवड करत असताना काय काळजी घ्यायची, ते काही पर्याय आज आपण पाहू या.
भारतात मोबाइलचा वापर वाढत आहे हे काही नव्याने सांगणे गरजेचे नाही. पण यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे अनेक भारतीय कंपन्या मोबाइल उत्पादन क्षेत्रात उतरल्या. याचा फायदा असा झाला की मोबाइलच्या किमती कमी झाल्या. यामुळे सामन्यांच्या खिशातही जास्त सुविधा असलेला मोबाइल दिसू लागला. आंतरराष्ट्रीय माहिती मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार भारतीय ब्रँडची विक्री गेल्या वर्षांत कमालीची वाढली आहे. भारतीय कंपन्या मायक्रोमॅक्स आणि कार्बन यांनी सन २०१३ मध्ये मोबाइल मार्केटमध्ये ३२ टक्के आपला वाटा नोंदविला आहे. यामुळे बडय़ा कंपन्यांच्या स्थानाला काही धक्का बसला नसला तरी त्यांची विक्री मात्र कमी झाली आहे. याच भारतीय कंपन्या येत्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस ४ मध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मायक्रोमॅक्सच्या कॅन्व्हास एचडीमध्ये मिळतात. याची किंमत १५ हजापर्यंत असल्यामुळे जास्त सुविधा आणि कमी पसे अशी गणिते असलेले ग्राहक मायक्रोमॅक्सचा पर्याय स्वीकारतात. यामध्ये सध्या कार्बन, लावा, इंटेक्स, आयबॉल, झोलो, सेलकोन, जोश अशा कंपन्याही बाजारात आल्या आहेत. त्यांचेही विविध फोन मार्केटमध्ये येत असल्यामुळे अनेकांना ते पर्यायही योग्य वाटत आहेत. हे सर्व पर्याय चिनी मोबाइलपेक्षा चांगले असतात. या कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात अगदी तीन ते चार हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामुळे सध्या आपल्यला स्वस्त आणि मस्त असे फोन उपलब्ध झाले आहेत.
भारतीय बाजारपेठ ही किमतीवर चालणारी आहे. हे लक्षात घेऊन भारतीय कंपन्यांनी चांगल्या सुविधा असलेले मोबाइल स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. हे मोबाइल स्वस्त आहेत म्हणून ते चांगले नाहीत असा अनेकांचा समाज असतो. हे काही प्रमाणात सत्य असले तरी ज्यांना जास्त पसे खर्च करावयाचे नसतील त्यांच्यासाठी हे पर्याय अगदी वाईटही ठरत नाहीत. या कंपन्यांचे फोन २० हजार रुपयांत आपल्याला ४० हजार रुपयांचा फोन वापरात असल्याचे भासवतात. म्हणजे तशा ९९ टक्के सुविधा या फोन्समध्ये असतात.

स्मार्टफोन घेताना कोणती काळजी घ्याल-
तुम्ही कोणत्याही कंपनीचे स्मार्टफोन घेत असाल तेव्हा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात जर तुम्ही स्वस्त फोन घेत असाल आणि तुमच्या मनात शेकडो प्रश्न पडत असतील तर तुम्ही खालील गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
स्क्रीनचा दर्जा- स्मार्टफोन घेताना तुम्ही स्क्रीनचा दर्जा तपासणे नक्कीच योग्य ठरेल. यामध्ये स्क्रीनचा आकार किमान तीन ते चार इंच इतका असावा. त्याचे रिझोल्यूशन किमान ३२० गुणिले ४८० इतके असावे. ही स्क्रीन फोटो पाहण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी तशी योग्य नसते. यामुळे तुम्हाला बजेट वाढविणे शक्य असेल तर स्क्रीनचे रिझोल्यूशन हे किमान ४८० गुणिले ८०० इतके असावे.
प्रोसेसरचा दर्जा - स्वस्त मोबाइलमध्ये प्रोसेसर कमी क्षमतेचे असतात. यामुळे त्याची क्षमता तपासून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये बहुतांश वेळा एक गिगाहर्टझचा सिंगल कोर प्रोसेसर असतो. यामुळे फोन स्लो होणे किंवा काम करताना बंद पडणे असे प्रकार होतात. यामुळे फोन घेताना किमान डय़ुएल कोर असणे गरजेचे आहे. यामुळे फोन चांगल्या प्रकारे चालू शकतो.
कॅमेरा- फोनमध्ये किमान पाच मेगापिक्सेल कॅमेरा असावा. यामध्ये एलईडी फ्लश असावा. यामुळे तुम्हाला फोनमध्ये चांगले फोटो आणि व्हिडीओ आपण रेकॉर्ड करू शकतो. काही फोन एचडी कॅमेरा देतात. पण हे कॅमेरे व्हीएजी रेझोल्यूशनवर आधारित असतात. काही फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असतो. याद्वारे तुम्ही व्हिडीओ कॉल्स करू शकतात.
ऑपरेटिंग सिस्टीम- अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोनच सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे फोनमध्ये ४.० ओएस असलेलेच फोन विकत घ्या. जर तसे झाले नाही तर तुम्हाला नवीन अप्स वापरणे शक्य होणार नाही. िवडोज ७ वर आधारित स्वस्त फोन शक्यतो विकत घेऊ नका.
सेवा केंद्रांची यादी- हे फोन घेतल्यावर आपल्या जवळील सेवा केंद्रांची यादी जरूर घ्या. या कंपन्या नवीन असल्यामुळे त्यातील बहुतांश कंपन्याचे सेवाकेंद्र सर्वत्र उपलब्ध नाही आहेत. यामुळे याबाबत जागरूक राहणे अधिक फायद्याचे ठरेल.
फोन्सचे काही पर्याय
इंटेक्स 'अ‍ॅक्वा ऑक्टा'
स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची एक कॉमन तक्रार आहे, ती बॅटरी लाइफबद्दल.. इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅपमुळे बॅटरी झपाझप संपते आणि दिवसातून दोन वेळा चार्ज करूनही ती पुरत नाही. सगळ्यांचीच ही ओरड ऐकल्यानंतर, बॅटरी जास्त काळ टिकावी या दृष्टीनं इंटेक्सनं आपल्या 'अ‍ॅक्वा ऑक्टा'मध्ये सुसज्ज यंत्रणा बसवली आहे. १.७ गिगाहर्ट्झ एमटी ६५९२ ऑक्टा कोअर चिपसेट आणि दोन जीबी रॅममुळे हा फोन सुस्साट वेगानं चालेल, असा कंपनीचा दावा आहे. त्यात अँड्रॉइड ४.२ जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेय. दोन सिमच्या या मोबाइलची स्क्रीन सहा इंची असून वजन १८० ग्रॅम आहे. २३०० बॅटरीच्या जोरावर हा फोन सहा तासांचा टॉक टाइम आणि १८० तासांच्या स्टँडबायची खात्री देतो. 'अ‍ॅक्वा ऑक्टा'मध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज क्षमता १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
किंमत- १९, ९९९
मायक्रोमॅक्स कॅन्व्हास
या फोनमध्ये आपल्याला सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असून त्याचं स्क्रीन पाच इंचांचा आहे. इतकेच नव्हे तर त्याचा प्रोसेसर क्वाड कोर आहे. यामध्ये आपल्याला एचडी व्हर्जनही उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये 'ब्ल्वो टू अनलोक' आणि 'स्मार्ट पॉज व्हाईल वॉचिंग व्हिडीओ' असे नवे पर्याय देण्यात आले आहेत. याचा कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे. या सिरीजमध्ये आपल्याला ९६९० पासून ते १७ हजापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कार्बन टिटानियम
या कंपनीनेही स्मार्टफोन बाजारात आणले असून ते ५.५ इंच डिस्प्लेचे आहेत. हे डिस्प्ले पूर्णत एचडी असे आहेत. यामध्ये क्वाड कोर प्रोसेसर वापरण्यात आला असून कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंग गालाक्सी मेगाला चांगला पर्याय ठरू शकतो. याची किंमत १९९९० इतकी आहे. यामध्ये आणखी स्वस्त फोनही उपलब्ध आहेत.

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

दातांचे उपचार आणि त्यामागचे गैरसमज..............


छान चवीचे पदार्थ खायला सर्वानाच  खूप आवडतात. पण खाऊन झाल्यावर खळखळून चूळ भरणे, गुळण्या करणे, सकाळप्रमाणेच रात्री झोपतानाही ब्रशने दात घासणे या  साध्या गोष्टींचा मात्र अनेकांना आळस असतो. रोज अशा लहान लहान बाबींची काळजी घेतली तर दाताच्या समस्या उद्भवणारच नाहीत. पण कधी दातांच्या डॉक्टरांकडे जायची वेळ आलीच तरी गैरसमजांमुळे किंवा नाहक भीतीमुळे ते टाळणारे किंवा पुढे ढकलत राहणारे  लोक अनेक दिसतात. दातांच्या डॉक्टरांकडे जायचे म्हटले की भीती का वाटते, काय असतात हे गैरसमज, याविषयी सांगताहेत दंतउपचार तज्ज्ञ  डॉ. परेश गांधी.  

गैरसमज १) वरचे दात काढल्यावर डोळे कमजोर होतात. 
सत्य- पूर्वी दात काढण्याची वेळ सहसा वयस्कर व्यक्तींवर यायची. चाळिशीच्या आसपास उद्भवलेली दातांची दुखणी, त्यामुळे काढावे लागलेले दात आणि साधारणपणे त्याच वेळी लागलेला चाळिशीचा चष्मा या तीन गोष्टी योगायोगाने एकत्र आल्यामुळे वरचे दात काढल्यावर डोळ्यांवर वाईट परिणाम होतो असा समज रूढ झाला असावा. खरे म्हणजे दातांच्या आणि डोळ्यांच्या शिरा पूर्णत: वेगळ्या असतात. त्यामुळे दात काढण्याचा डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही. 

गैरसमज २) दातांची स्वच्छता करून घेतली तर दात सैल होतात.
सत्य- दातांच्या भोवती असणाऱ्या हिरडी आणि हाडांच्या मजबुतीवर दातांचा मजबूतपणाही अवलंबून असतो. दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले तर दात व हिरडय़ांभोवती 'टारटर' आणि 'प्लाक' म्हणजे जंतूंचा थर जमतो. हे जंतू हिरडय़ा व दातांची झीज करू लागतात आणि दातांमधली फटही वाढवतात. दातांचे डॉक्टर रुग्णाच्या दातांची स्वच्छता करताना हा थर दूर करतात. दात व हिरडय़ांवर जमलेला थर दूर झाला की दातांमधली फट नीट दिसू लागते आणि दात सैल झाले की काय, असा रुग्णांचा समज होतो. पण हा थर काढल्यामुळे दातांच्या पुढच्या समस्या टळतात. खरे म्हणजे प्रत्येकाने सुरूवातीपासूनच आपल्या दातांची योग्य निगा राखली तर डॉक्टरांकडून दात स्वच्छ करून घ्यायची वेळच येणार नाही. 

गैरसमज ३) दातांमधील कीड काढून दात भरून घेतल्यावर ते पुन्हा किडत नाहीत. 
सत्य- दातांमधली कीड काढली की त्यात 'फिलिंग' भरले जाते. पण पुढच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवले नाही तर दात पुन्हा किडू शकतात. कारण फिलिंग भरलेले असले तरी दातांमधील नसा आणि रक्तवाहिन्या जिवंत असतात. त्यामुळे प्रसंगी विशिष्ट प्रकारच्या ब्रशचा वापर करून दात स्वच्छ ठेवणे फायद्याचे ठरते. 

गैरसमज ४) दाताच्या डॉक्टरांकडे एकदा गेल्यावर उपचारांची जंत्रीच सुरू होते.
सत्य- साधारणपणे आपल्या तोंडात २८ दात असतात. खूपदा रुग्ण एखादा दात दुखत असल्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. त्या वेळी त्याच्या इतर एखाद्- दुसऱ्या दातालाही किडण्याची समस्या असू शकते. पण दुसरा दात दुखत नसल्यामुळे रुग्णाचे त्याकडे लक्ष गेलेले नसते. तपासणीत ती आधीपासूनच असलेली समस्या दृष्टीस पडते आणि एका दातामागोमाग इतरही दातांवर उपचार करून घेणे मागे लागले, असा रुग्णाचा समज होतो.

गैरसमज ५) दुधाचे दात आपोआप पडून नवीन येणारच असतात, त्यामुळे दुधाच्या दातांची निगा राखणे आवश्यक नाही. 
सत्य- दुधाचे निरोगी दात हा पक्क्य़ा दातांचा पाया असतो. हल्ली फास्ट फूड आणि गोळ्या- चॉकलेट अति प्रमाणात खाल्ले गेल्यामुळे लहान मुलांचे दुधाचे दात लवकर किडतात. हे दात किडून तिथे वेदना होऊ लागल्यामुळे मूल नीट खाऊ शकत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे बाळाला पहिला दुधाचा दात आला की त्याचे दात आणि तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे. मूल थोडेसे मोठे झाले की त्याला सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश- पेस्टने दात घासण्याची सवय लावणे.

गैरसमज ६) ब्रशपेक्षा दंतमंजन आणि बोटांच्या साहाय्याने दात स्वच्छ करणे चांगले.
सत्य- दातांच्या मध्ये अनेक फटी असतात. दाढांच्या वरच्या भागावर नैसर्गिक उंचवटे, खोलगट भाग आणि चिरा असतात. या ठिकाणी अन्नकण अडकून राहतात. ब्रशचे ब्रस्टल्स या कान्याकोपऱ्यात पोहोचून अडकलेले अन्नकण स्वच्छ करतात. बोटांच्या साहाय्याने दात घासल्यासारखे वाटले तरी अन्नकण साफ होतीलच असे नाही. पण पावडर आणि बोटांनी हिरडय़ांना मसाज करणे फायद्याचे ठरते आणि ब्रशने दात घासून झाल्यावर ते जरूर करावे. 

गैरसमज ७) ब्रश वापरल्यामुळे हिरडय़ांमधून रक्त येते.  
सत्य- हिरडय़ांमधून रक्त येणे हे 'पायोरिया' या दंतरोगाचे लक्षण असू शकते. दाताभोवती साचलेले कीटण या रोगासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. कीटण साचल्यामुळे हिरडय़ा सुजतात व लालसर आणि सैल होतात. अशा हिरडय़ांवर ब्रश फिरवला की रक्त येते आणि रुग्णाला ब्रश वापरणेच सोडून द्यावेसे वाटते. अशा वेळी ब्रशऐवजी बोटांनी दात घासले तर कदाचित हिरडय़ांमधून रक्त येणार नाही पण बोटांनी कीटण स्वच्छही होत नाही. अशा वेळी दंतवैद्यांकडून दात व हिरडय़ांची तपासणी करून घेऊन गरज असल्यास दातांची स्वच्छता (स्केलिंग) करून घ्यावी. हिरडय़ांवरील कीटण काढून टाकल्यावर ब्रशने दात नक्कीच घासता येतील. 

गैरसमज ८) दातांचे उपचार करून घेताना फार वेदना होतात. 
सत्य- योग्य रित्या भूल देऊन दातांचे सर्व उपचार वेदनारहित पद्घतीने होऊ शकतात. दातांमध्ये देण्याच्या इंजेकशनची सुईही आता 'मायक्रो नीडल' प्रकारची वापरतात. हिरडय़ांवर विशिष्ट प्रकारचे जेल किंवा स्प्रे वापरून सुई टोचण्याआधी हिरडय़ा बधिर करता येतात. त्यामुळे सुई टोचली तरी टोचल्याची संवेदना जाणवत नाही. लेसर उपचारपद्धतीसारख्या आधुनिक पद्धतीही आता अगदी रुढ झाल्या आहेत. 

गैरसमज ९) गरोदर स्त्रीने दातांचे उपचार टाळावेत. 
सत्य- गरोदर स्त्रीने गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत दात स्वच्छ करून घेणे, फिलिंग करणे असे बेसिक उपचार करून घेण्यास हरकत नसते. एक्स- रे काढणे, दात काढून घेणे असे उपचार आणि गोळ्या- औषधे घेणे शक्यतो टाळावे. गरज असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावे. गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या तिमाहीत मात्र दातांवरील उपचार आणि औषधे टाळावीत. तरीही उपचारांबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे.  

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

ऑनलाइन शॉपिंग




जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साइट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साइटवरून खरेदी करतो. आणखी काय सांगतात ऑनलाईन शॉपिंगचे ट्रेंड्स?
ऑनलाइन शॉिपग हा शब्द आता तसा काही नवीन नाही. आजकाल ऑनलाइन शॉिपगची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली बदलती लाईफस्टाईल त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक वीकेण्डच्या सुरुवातीला आपण दोन दिवसांच्या सुट्टीचा प्लॅन आखत असतो आणि त्या प्लॅनमध्ये हमखास एक गोष्ट ठरलेली असते ती म्हणजे 'शॉिपग'!! वीकेण्डच्या सुट्टीमध्ये आठवडाभराची सगळीच कामं उरकायची असतात आणि मग नाईलाजाने का होईना पण शॉिपगसाठी बाजारात जायला फुरसतच मिळत नाही. मग घरबसल्या शॉपिंगचा पर्याय असतो ऑनलाइन शॉपिंगमधून.
जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साईट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साईटवरून खरेदी करतो. इतकंच काय तर काहींच्या ऑनलाइन खरेदी करण्याच्या वस्तूदेखील ठरलेल्या असतात. एरवी साध्या दुकानात स्त्रियांना बरंच काही पाहून, तासन्तास त्यात घालवून हवी ती वस्तू घ्यायची सवय असते, मग ती ब्रॅण्डेड असो व नसो. आवडली की घ्यायची अशी स्त्रियांची पॉलिसी असते. ती ऑनलाइन शॉिपग करतानाही दिसून येते. अनेक दुकानांप्रमाणे येथे अनेक साइट्स धुंडाळून त्यांची ऑनलाइन खरेदी होते; पुरुष मात्र जास्त ब्रॅण्ड कॉन्शन्स असतात. ज्या ब्रॅण्डची वस्तू हवी असेल त्याच ब्रॅण्डच्या साइटवर जाऊन ते झटपट आपली खरेदी उरकतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी स्त्रियांचं समजलं जाणारं शॉिपग डिपार्टमेंट ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत मात्र पुरुषांकडे गेलंय. म्हणजेच एका सर्वेक्षणानुसार भारतीय पुरुषांची ऑनलाइन शॉिपग करण्याची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे! पुरुष अधिक नेटसॅव्ही आहेत, हेही त्यामागचं कारण असू शकतं.
ऑनलाइन शॉपर्सच्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास ४५ टक्के लोक कपडे खरेदीसाठी ऑनलाइन शॉिपग करतात. सगळ्यात जास्त ऑनलाइन परचेसिंग सिनेमा तिकीट, मोबाइल अ‍ॅप्स आणि हवाई तिकीट यांचे होते. आज आपल्याकडे जे स्मार्ट फोन्स किंवा टॅबलेट्स आले आहेत, याचाही उपयोग ऑनलाइन शॉिपगसाठी करणारे अनेकजण आहेत. खरं तर ऑनलाइन शॉिपग या संकल्पनेने एक मोठी क्रांतीच घडवून आणली आहे. पुस्तकांपासून कपडे, भांडी, बूट, दागिने, मेकअपचे सामान ऑनलाइन मागविण्यात येतात. सध्या बेबी प्रॉडक्ट्स तसेच न्यूट्रिशन-फूड ऑनलाइन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड काही सर्वेक्षणातून दिसतो.
कसं कराल ऑनलाइन शॉिपग?
ऑनलाइन शॉिपग करायचं असल्यास वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध आहेत. त्याद्वारे तुम्ही शॉिपग करू शकता. उदा. होम शॉप १८, फ्लिपकार्ट आदी साइट्सवर तुम्ही गेलात की, कॅटलॉगवरून आपल्या पसंतीची गोष्ट निवडू शकता.
* ऑनलाइन शॉिपग करताना पशाचे व्यवहार तुम्ही कसे करणार आहात ते ठरवून घ्या. एक तर तुमचं प्रॉडक्ट घरी आल्यावर तुम्ही प्रत्यक्ष पसे देऊ शकता (याला कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा लागतो) किंवा काही साइट्स तुम्हाला ऑनलाइन पेमेंटचाही पर्याय देतात. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही बिलाची चुकवणी करू शकता.
* ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट कार्डवरून तुम्ही पैसे भरू शकता.
* काही साइट्स तर याच्याही पुढे जाऊन तुम्हाला प्रॉडक्ट घरी आणून दाखवतात, त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष पाहून घ्यायची की नाही याचा पर्याय तुमच्या हाती असतो; पण काही साइट्सवर एकदा तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट केलंत की तेच फायनल होऊन जातं.
आता तुम्हीसुद्धा घरबसल्या या माध्यमातून मनपसंत शॉिपग करू शकता. ऑनलाइन शॉिपगचा नवा आणि सोयीस्कर ट्रेण्ड सध्या अनेकांना शॉिपगसाठी मदत करतोय. जिनेसिस या कंपनीने केलेल्या अभ्यासातून भारतातील अनेक व्यापारी आता ई-कॉमर्सकडे वळताहेत असे दिसून आले आहे. बाजारपेठा आता ई-जगताचा ताबा घेताहेत. 'रिपोर्ट ऑन ई-कॉमर्स अ‍ॅडॉप्शन बाय अ‍ॅपरल रिटेलर्स २०१३' यांनी केलेल्या अभ्यासातून २७.५ टक्के व्यापाऱ्यांनी आता ई-कॉमर्सकडे आपलं मार्केट वळवलंय; तर २०.१ टक्के व्यापारी आता प्रत्यक्ष ऑनलाइनच्या व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉिपग आता सहजपणे उपलब्ध झाले आहे. प्युमा, नायके, आदिदास, डब्लूसारखे ब्रॅण्ड याअगोदरच ग्राहकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहे. आता इतरही अनेक ब्रॅण्ड्स आणि मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स ऑनलाइन शॉपिंगचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहेत.
ऑनलाइन खरेदीला मिळणारी ग्राहकांची पसंती आणि ई-शॉिपगच वाढतं प्रस्थ यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे टाइट शेडय़ुल. ई-शॉिपगमुळे कुठूनही आपण अगदी आपल्या मनासारखी आणि कमीत कमी वेळात खरेदी करू शकतो. सुरुवातीला अनेकजण ऑनलाइन शॉिपगबाबतीत फारसे जागरूक नव्हते. मालाची गुणवत्ता, पैशाचे व्यवहार याबाबत अनेक शंका असायच्या. पण गेल्या काही काळात ऑनलाइन शॉिपग साइट्सचा युझर फ्रेंडली अ‍ॅप्रोच ग्राहकांनाही आवडत आहे.

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

हिवाळ्यात त्वचेला राखा चिरतरुण



थंडीला आता सुरुवात होत आहे. थंडीत त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चरायझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या थंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी काही टिप्स-
त्वचेची निगा राखण्यासाठी दररोज काही प्राथमिक गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. त्यात मॉइश्चरायझरचा सामावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि ती ताजीतवानीही होते. नारळाचा समावेश असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगले असते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा एक्झफोलिएटिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकली जाते. यासाठी घरगुती उपायही करतात. भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेह-यावर वर्तुळाकारात चोळावे.
हात आणि पावलांची विशेष काळजी घ्यावी. कारण त्यांची त्वचा लगेच शुष्क आणि रुक्ष बनते. अशी त्वचा मऊसूत राहण्यासाठी त्यावर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावावे.
त्वचेला मॉइश्चराइझ करणारा फेस पॅक घरच्या घरी बनवा आणि त्वचा अधिक मऊ बनवा. पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा आणि त्याने ओल्या चेह-याला १५ मिनिटे मसाज करावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहिती



दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-


1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.

2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.

3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.

6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.

7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.

8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.

9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.

10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.

11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.

12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती.

14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.

15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.

16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत. 



गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

वनऔषधी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी



 अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. अशोकाचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधाबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते. शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होण्यास मदत होते. ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात. सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते. दूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. १० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.