शनिवार, १६ मार्च, २०१३

आई मराठी कविता --- जितेंद्र जोशी


आई मराठी कविता --- जितेंद्र जोशी

ही कविता हिंदीतील आहे.
"नारायण सुर्वे" ह्यांनी ह्या कवितेचे मराठीत भाषांतर केले आहे.
"जितेंद्र जोशी" ह्यांनी ही कविता "झी मराठी" वर झालेल्या "स्वरतरंग" ह्या कार्यक्रमात सादर केली होती.
-----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
हंबरून वासराले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा
पीठामंदी.....पीठामंदी
पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय..
तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी
पायात नसे वाहन तिझ्या,फिरे अनवाणी
काट्याकुट्या...रं काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं
तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं... दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं
बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं
आगं शिकूनं शानं...गं शिकूनं शानं
शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बापं
थरथर कापे अन् लागे तिले धापं
कसा ह्याच्या...रं कसा ह्याच्या
कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं
तवा मले गायीमंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी
नं भरल्या डोळ्यान...नं भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायं
तवा मले सायीमंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले......

गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटी
तुझ्या चरणी...गं तुझ्या चरणी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायं
तवा मले पायामंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा