गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

ऑनलाइन शॉपिंग




जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साइट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साइटवरून खरेदी करतो. आणखी काय सांगतात ऑनलाईन शॉपिंगचे ट्रेंड्स?
ऑनलाइन शॉिपग हा शब्द आता तसा काही नवीन नाही. आजकाल ऑनलाइन शॉिपगची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली बदलती लाईफस्टाईल त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक वीकेण्डच्या सुरुवातीला आपण दोन दिवसांच्या सुट्टीचा प्लॅन आखत असतो आणि त्या प्लॅनमध्ये हमखास एक गोष्ट ठरलेली असते ती म्हणजे 'शॉिपग'!! वीकेण्डच्या सुट्टीमध्ये आठवडाभराची सगळीच कामं उरकायची असतात आणि मग नाईलाजाने का होईना पण शॉिपगसाठी बाजारात जायला फुरसतच मिळत नाही. मग घरबसल्या शॉपिंगचा पर्याय असतो ऑनलाइन शॉपिंगमधून.
जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साईट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साईटवरून खरेदी करतो. इतकंच काय तर काहींच्या ऑनलाइन खरेदी करण्याच्या वस्तूदेखील ठरलेल्या असतात. एरवी साध्या दुकानात स्त्रियांना बरंच काही पाहून, तासन्तास त्यात घालवून हवी ती वस्तू घ्यायची सवय असते, मग ती ब्रॅण्डेड असो व नसो. आवडली की घ्यायची अशी स्त्रियांची पॉलिसी असते. ती ऑनलाइन शॉिपग करतानाही दिसून येते. अनेक दुकानांप्रमाणे येथे अनेक साइट्स धुंडाळून त्यांची ऑनलाइन खरेदी होते; पुरुष मात्र जास्त ब्रॅण्ड कॉन्शन्स असतात. ज्या ब्रॅण्डची वस्तू हवी असेल त्याच ब्रॅण्डच्या साइटवर जाऊन ते झटपट आपली खरेदी उरकतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी स्त्रियांचं समजलं जाणारं शॉिपग डिपार्टमेंट ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत मात्र पुरुषांकडे गेलंय. म्हणजेच एका सर्वेक्षणानुसार भारतीय पुरुषांची ऑनलाइन शॉिपग करण्याची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे! पुरुष अधिक नेटसॅव्ही आहेत, हेही त्यामागचं कारण असू शकतं.
ऑनलाइन शॉपर्सच्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास ४५ टक्के लोक कपडे खरेदीसाठी ऑनलाइन शॉिपग करतात. सगळ्यात जास्त ऑनलाइन परचेसिंग सिनेमा तिकीट, मोबाइल अ‍ॅप्स आणि हवाई तिकीट यांचे होते. आज आपल्याकडे जे स्मार्ट फोन्स किंवा टॅबलेट्स आले आहेत, याचाही उपयोग ऑनलाइन शॉिपगसाठी करणारे अनेकजण आहेत. खरं तर ऑनलाइन शॉिपग या संकल्पनेने एक मोठी क्रांतीच घडवून आणली आहे. पुस्तकांपासून कपडे, भांडी, बूट, दागिने, मेकअपचे सामान ऑनलाइन मागविण्यात येतात. सध्या बेबी प्रॉडक्ट्स तसेच न्यूट्रिशन-फूड ऑनलाइन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड काही सर्वेक्षणातून दिसतो.
कसं कराल ऑनलाइन शॉिपग?
ऑनलाइन शॉिपग करायचं असल्यास वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध आहेत. त्याद्वारे तुम्ही शॉिपग करू शकता. उदा. होम शॉप १८, फ्लिपकार्ट आदी साइट्सवर तुम्ही गेलात की, कॅटलॉगवरून आपल्या पसंतीची गोष्ट निवडू शकता.
* ऑनलाइन शॉिपग करताना पशाचे व्यवहार तुम्ही कसे करणार आहात ते ठरवून घ्या. एक तर तुमचं प्रॉडक्ट घरी आल्यावर तुम्ही प्रत्यक्ष पसे देऊ शकता (याला कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा लागतो) किंवा काही साइट्स तुम्हाला ऑनलाइन पेमेंटचाही पर्याय देतात. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही बिलाची चुकवणी करू शकता.
* ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट कार्डवरून तुम्ही पैसे भरू शकता.
* काही साइट्स तर याच्याही पुढे जाऊन तुम्हाला प्रॉडक्ट घरी आणून दाखवतात, त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष पाहून घ्यायची की नाही याचा पर्याय तुमच्या हाती असतो; पण काही साइट्सवर एकदा तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट केलंत की तेच फायनल होऊन जातं.
आता तुम्हीसुद्धा घरबसल्या या माध्यमातून मनपसंत शॉिपग करू शकता. ऑनलाइन शॉिपगचा नवा आणि सोयीस्कर ट्रेण्ड सध्या अनेकांना शॉिपगसाठी मदत करतोय. जिनेसिस या कंपनीने केलेल्या अभ्यासातून भारतातील अनेक व्यापारी आता ई-कॉमर्सकडे वळताहेत असे दिसून आले आहे. बाजारपेठा आता ई-जगताचा ताबा घेताहेत. 'रिपोर्ट ऑन ई-कॉमर्स अ‍ॅडॉप्शन बाय अ‍ॅपरल रिटेलर्स २०१३' यांनी केलेल्या अभ्यासातून २७.५ टक्के व्यापाऱ्यांनी आता ई-कॉमर्सकडे आपलं मार्केट वळवलंय; तर २०.१ टक्के व्यापारी आता प्रत्यक्ष ऑनलाइनच्या व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉिपग आता सहजपणे उपलब्ध झाले आहे. प्युमा, नायके, आदिदास, डब्लूसारखे ब्रॅण्ड याअगोदरच ग्राहकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहे. आता इतरही अनेक ब्रॅण्ड्स आणि मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स ऑनलाइन शॉपिंगचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहेत.
ऑनलाइन खरेदीला मिळणारी ग्राहकांची पसंती आणि ई-शॉिपगच वाढतं प्रस्थ यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे टाइट शेडय़ुल. ई-शॉिपगमुळे कुठूनही आपण अगदी आपल्या मनासारखी आणि कमीत कमी वेळात खरेदी करू शकतो. सुरुवातीला अनेकजण ऑनलाइन शॉिपगबाबतीत फारसे जागरूक नव्हते. मालाची गुणवत्ता, पैशाचे व्यवहार याबाबत अनेक शंका असायच्या. पण गेल्या काही काळात ऑनलाइन शॉिपग साइट्सचा युझर फ्रेंडली अ‍ॅप्रोच ग्राहकांनाही आवडत आहे.

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

हिवाळ्यात त्वचेला राखा चिरतरुण



थंडीला आता सुरुवात होत आहे. थंडीत त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चरायझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या थंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी काही टिप्स-
त्वचेची निगा राखण्यासाठी दररोज काही प्राथमिक गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. त्यात मॉइश्चरायझरचा सामावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि ती ताजीतवानीही होते. नारळाचा समावेश असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगले असते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा एक्झफोलिएटिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकली जाते. यासाठी घरगुती उपायही करतात. भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेह-यावर वर्तुळाकारात चोळावे.
हात आणि पावलांची विशेष काळजी घ्यावी. कारण त्यांची त्वचा लगेच शुष्क आणि रुक्ष बनते. अशी त्वचा मऊसूत राहण्यासाठी त्यावर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावावे.
त्वचेला मॉइश्चराइझ करणारा फेस पॅक घरच्या घरी बनवा आणि त्वचा अधिक मऊ बनवा. पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा आणि त्याने ओल्या चेह-याला १५ मिनिटे मसाज करावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहिती



दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-


1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.

2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.

3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.

6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.

7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.

8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.

9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.

10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.

11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.

12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती.

14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.

15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.

16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.