गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

ऑनलाइन शॉपिंग




जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साइट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साइटवरून खरेदी करतो. आणखी काय सांगतात ऑनलाईन शॉपिंगचे ट्रेंड्स?
ऑनलाइन शॉिपग हा शब्द आता तसा काही नवीन नाही. आजकाल ऑनलाइन शॉिपगची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली बदलती लाईफस्टाईल त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक वीकेण्डच्या सुरुवातीला आपण दोन दिवसांच्या सुट्टीचा प्लॅन आखत असतो आणि त्या प्लॅनमध्ये हमखास एक गोष्ट ठरलेली असते ती म्हणजे 'शॉिपग'!! वीकेण्डच्या सुट्टीमध्ये आठवडाभराची सगळीच कामं उरकायची असतात आणि मग नाईलाजाने का होईना पण शॉिपगसाठी बाजारात जायला फुरसतच मिळत नाही. मग घरबसल्या शॉपिंगचा पर्याय असतो ऑनलाइन शॉपिंगमधून.
जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साईट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साईटवरून खरेदी करतो. इतकंच काय तर काहींच्या ऑनलाइन खरेदी करण्याच्या वस्तूदेखील ठरलेल्या असतात. एरवी साध्या दुकानात स्त्रियांना बरंच काही पाहून, तासन्तास त्यात घालवून हवी ती वस्तू घ्यायची सवय असते, मग ती ब्रॅण्डेड असो व नसो. आवडली की घ्यायची अशी स्त्रियांची पॉलिसी असते. ती ऑनलाइन शॉिपग करतानाही दिसून येते. अनेक दुकानांप्रमाणे येथे अनेक साइट्स धुंडाळून त्यांची ऑनलाइन खरेदी होते; पुरुष मात्र जास्त ब्रॅण्ड कॉन्शन्स असतात. ज्या ब्रॅण्डची वस्तू हवी असेल त्याच ब्रॅण्डच्या साइटवर जाऊन ते झटपट आपली खरेदी उरकतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी स्त्रियांचं समजलं जाणारं शॉिपग डिपार्टमेंट ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत मात्र पुरुषांकडे गेलंय. म्हणजेच एका सर्वेक्षणानुसार भारतीय पुरुषांची ऑनलाइन शॉिपग करण्याची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे! पुरुष अधिक नेटसॅव्ही आहेत, हेही त्यामागचं कारण असू शकतं.
ऑनलाइन शॉपर्सच्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास ४५ टक्के लोक कपडे खरेदीसाठी ऑनलाइन शॉिपग करतात. सगळ्यात जास्त ऑनलाइन परचेसिंग सिनेमा तिकीट, मोबाइल अ‍ॅप्स आणि हवाई तिकीट यांचे होते. आज आपल्याकडे जे स्मार्ट फोन्स किंवा टॅबलेट्स आले आहेत, याचाही उपयोग ऑनलाइन शॉिपगसाठी करणारे अनेकजण आहेत. खरं तर ऑनलाइन शॉिपग या संकल्पनेने एक मोठी क्रांतीच घडवून आणली आहे. पुस्तकांपासून कपडे, भांडी, बूट, दागिने, मेकअपचे सामान ऑनलाइन मागविण्यात येतात. सध्या बेबी प्रॉडक्ट्स तसेच न्यूट्रिशन-फूड ऑनलाइन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड काही सर्वेक्षणातून दिसतो.
कसं कराल ऑनलाइन शॉिपग?
ऑनलाइन शॉिपग करायचं असल्यास वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध आहेत. त्याद्वारे तुम्ही शॉिपग करू शकता. उदा. होम शॉप १८, फ्लिपकार्ट आदी साइट्सवर तुम्ही गेलात की, कॅटलॉगवरून आपल्या पसंतीची गोष्ट निवडू शकता.
* ऑनलाइन शॉिपग करताना पशाचे व्यवहार तुम्ही कसे करणार आहात ते ठरवून घ्या. एक तर तुमचं प्रॉडक्ट घरी आल्यावर तुम्ही प्रत्यक्ष पसे देऊ शकता (याला कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा लागतो) किंवा काही साइट्स तुम्हाला ऑनलाइन पेमेंटचाही पर्याय देतात. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही बिलाची चुकवणी करू शकता.
* ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट कार्डवरून तुम्ही पैसे भरू शकता.
* काही साइट्स तर याच्याही पुढे जाऊन तुम्हाला प्रॉडक्ट घरी आणून दाखवतात, त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष पाहून घ्यायची की नाही याचा पर्याय तुमच्या हाती असतो; पण काही साइट्सवर एकदा तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट केलंत की तेच फायनल होऊन जातं.
आता तुम्हीसुद्धा घरबसल्या या माध्यमातून मनपसंत शॉिपग करू शकता. ऑनलाइन शॉिपगचा नवा आणि सोयीस्कर ट्रेण्ड सध्या अनेकांना शॉिपगसाठी मदत करतोय. जिनेसिस या कंपनीने केलेल्या अभ्यासातून भारतातील अनेक व्यापारी आता ई-कॉमर्सकडे वळताहेत असे दिसून आले आहे. बाजारपेठा आता ई-जगताचा ताबा घेताहेत. 'रिपोर्ट ऑन ई-कॉमर्स अ‍ॅडॉप्शन बाय अ‍ॅपरल रिटेलर्स २०१३' यांनी केलेल्या अभ्यासातून २७.५ टक्के व्यापाऱ्यांनी आता ई-कॉमर्सकडे आपलं मार्केट वळवलंय; तर २०.१ टक्के व्यापारी आता प्रत्यक्ष ऑनलाइनच्या व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉिपग आता सहजपणे उपलब्ध झाले आहे. प्युमा, नायके, आदिदास, डब्लूसारखे ब्रॅण्ड याअगोदरच ग्राहकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहे. आता इतरही अनेक ब्रॅण्ड्स आणि मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स ऑनलाइन शॉपिंगचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहेत.
ऑनलाइन खरेदीला मिळणारी ग्राहकांची पसंती आणि ई-शॉिपगच वाढतं प्रस्थ यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे टाइट शेडय़ुल. ई-शॉिपगमुळे कुठूनही आपण अगदी आपल्या मनासारखी आणि कमीत कमी वेळात खरेदी करू शकतो. सुरुवातीला अनेकजण ऑनलाइन शॉिपगबाबतीत फारसे जागरूक नव्हते. मालाची गुणवत्ता, पैशाचे व्यवहार याबाबत अनेक शंका असायच्या. पण गेल्या काही काळात ऑनलाइन शॉिपग साइट्सचा युझर फ्रेंडली अ‍ॅप्रोच ग्राहकांनाही आवडत आहे.

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

हिवाळ्यात त्वचेला राखा चिरतरुण



थंडीला आता सुरुवात होत आहे. थंडीत त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चरायझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या थंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी काही टिप्स-
त्वचेची निगा राखण्यासाठी दररोज काही प्राथमिक गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. त्यात मॉइश्चरायझरचा सामावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि ती ताजीतवानीही होते. नारळाचा समावेश असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगले असते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा एक्झफोलिएटिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकली जाते. यासाठी घरगुती उपायही करतात. भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेह-यावर वर्तुळाकारात चोळावे.
हात आणि पावलांची विशेष काळजी घ्यावी. कारण त्यांची त्वचा लगेच शुष्क आणि रुक्ष बनते. अशी त्वचा मऊसूत राहण्यासाठी त्यावर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावावे.
त्वचेला मॉइश्चराइझ करणारा फेस पॅक घरच्या घरी बनवा आणि त्वचा अधिक मऊ बनवा. पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा आणि त्याने ओल्या चेह-याला १५ मिनिटे मसाज करावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहिती



दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-


1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.

2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.

3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.

6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.

7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.

8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.

9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.

10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.

11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.

12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती.

14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.

15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.

16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत. 



गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

वनऔषधी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी



 अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. अशोकाचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधाबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते. शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होण्यास मदत होते. ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात. सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते. दूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. १० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

आज गोकुळात रंग



आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !

तो चटोर चित्‍तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !

सांग श्यामसुंदरास काय जाहले ?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले !
एकटीच वाचशील काय तू तरी !

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्‍यात वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी !



बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

कॉर्पोरेटमध्ये जाताना...

हल्ली कोणत्याही कॉर्पोरेट नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या अपेक्षा बदलल्या आहेत. आधी नुसते नियमित काम करणारे कर्मचारी त्यांना हवे असत , पण आता चित्र वेगळे आहे. 

तुम्ही कामातून तुम्ही किती रिझल्ट देत आहात , याला महत्त्व आहे. एकेकाळी तुमच्या मार्कांना खूप प्राधान्य दिले जात होते , पण आता किती व्यवस्थित काम करता याला महत्त्व दिले जाते. अशाच काही अपेक्षांबाबत आणि त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन... 

जबाबदारी घ्या : जबाबदाऱ्या घेणारे आणि त्या व्यवस्थित पार पाडणारे कर्मचारी सगळ्याच कंपन्यांना हवे असतात. एखादे नवीन काम घेतले , तर ते नीट पूर्ण करून त्याच्या परिणामांची जबाबदारीही त्याच कर्मचाऱ्याने घ्यावी , अशीच अपेक्षा असते. मग बॉस किंवा इतर लोकांवर अवलंबून राहून काम करणाऱ्यांसाठी इथे कोणतीही जागा नाही. जर त्यात काही चुका निघाल्या , तर एकमेकांवर बोट दाखवून नाही चालत. 

कोणत्याही परीस्थितीत रिझल्ट द्या : कोणतीही आपत्ती आली तरी तुमचे काम तुम्ही करणार , अशी अपेक्षा केली जाते. नुसतेच काम करणारे लोक नाहीत , तर जीवतोड काम करून टार्गेट मिळवणारे लोक कोर्पोरेट्सना हवे असतात. 

निर्णय घ्यायला तयार राहा : वेळ आल्यास कठीण परीस्थितीतसुद्धा निर्णय घ्यायची तयारी ठेवा. दुसऱ्यावर ते ढकलू नका. ' प्ले सेफ ' हा मंत्र आता जुना झाला. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आलात याचाच अर्थ रिस्क घेणे , हे तुम्हाला जमायलाच हवे. 

टीमवर्क : कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन खूप क्लिष्ट असतात. सरळ सोपे असे काही नसते. त्यामुळे एकट्या दुकट्याने काम करायचे प्रसंग फार कमी येतात. बऱ्याचदा दुसऱ्या एखाद्या विभागाच्या व्यक्तीवर तुमची कामे अवलंबून असतात. त्यामुळे टीमवर्क हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच कारणासाठी क्रीडा किंवा इतर स्पर्धांमध्ये भाग घेणे फायद्याचे ठरते. त्यामुळे टीममध्ये काम कसे करावे , हे पुरेपूर शिकायला मिळते. 

क्वालिटी ओरिएण्टेशन : तुमच्या कामात नीटनेटकेपणा असणे , तसेच ते अचूक असणे महत्त्वाचे आहे. नुसतीच मेहनत नाही , तर तुम्ही तुमचे काम किती मन लावून आणि कल्पकतेने करत आहात , ते पहिले जाते. करायचे म्हणून केलेल्या कामात चुका राहतात आणि त्या सवयीमुळे पुढे त्रास होण्याची शक्यता आहे. 

समस्या सोडवा : कॉर्पोरेटमध्ये समस्यांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा ती सोडवणाऱ्या व्यक्तीसाठी स्थान आहे. इतरवेळीसुद्धा सगळे कुरकुर करत असताना जो ती समस्या सोडवतो तो इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरतो , ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 

स्मार्ट राहा : स्वतःला नीट प्रेझेंट करणारे , नम्र बोलणारे आणि आपल्या कामात चोख असणारे लोकच कॉर्पोरेटना हवी असतात. गरज असल्यास पर्सनॅलिटीसाठी थोडेफार ट्रेनिंगही घ्या. त्याचा नक्की फायदा होईल. 

या सात गोष्टी महत्त्वाच्या आहेतच , पण थोडक्यात यश हे मेहनत केल्यामुळेच मिळू शकते. तुमचे ध्येय नीट ठरवा आणि त्याच्यासाठी जीवतोड काम करा. त्यामुळे तुमच्यात आपोआप एक सकारात्मकता निर्माण होते आणि इतरांपेक्षा तुम्ही उठून दिसता. खूपदा तुम्हाला अपयशालासुद्धा सामोरे जावे लागेल , पण तिथूनच तुमच्या यशदायी वाटचालीची सुरुवात होते. 

Source : Pragati Fast/ Maharashtra Times.

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

मी आभारी आहे तुझा..........


मी आभारी आहे तुझा
माझ्या जीवनात येण्याबद्दल  
आणि येउन पुन्हा
एकट्याला सोडून गेल्याबद्दल 

मी आभारी आहे तुझा
मला स्वप्नं दाखवल्याबद्दल
स्वप्नातुन परत
वास्तवात आणल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल
आणि पुढचा प्रवास 
अर्धात सोडून गेल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा 
जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल
जाता जाता याच होडीला
वादळात सोडून गेल्याबद्दल

बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीस
दुस-या कुणीही नसती
इतकी दु:खं पचवली 
मी आभारी आहे तुझा
याही गोष्टीसाठी........
 

सोमवार, २९ जुलै, २०१३

रिपोर्टर व्हा!



सन २०२० पर्यंत भारतात टीव्ही चॅनेल्सच्या संख्येत भर पडणार असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. टीव्ही पत्रकारिता हा एक चांगला करिअर पर्याय म्हणून नव्या पिढीने निश्चितच आजमावून पाहायला हवा.

नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर सायंकाळी ७ वाजता आपल्या घरात घुमणारा आवाज असो किंवा मग हल्लीची ब्रेकिंग न्यूज असो. प्रभात समयी ऐकू येणारा ' यह आकाशवाणी है... ' असा आवाज असो किंवा एफएम वाहिन्यांवरील रेडिओ जॉकीचे श्रोत्यांना भुरळ घालणारे मनोरंजन असो. नानाविध मार्गांनी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची क्रांती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. एकविसावं शतक हे माहिती-तंत्रज्ञानासोबतच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचंही आहे. आज देश-विदेशातील अपडेट घडामोडी काही सेकंदांत आपण रिमोटची बटने प्रेस करून बघू शकतो. या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे प्रस्थ जगभरात पसरले आहे आणि त्यामुळेच या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आज भारतात साधारण २०० राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तवाहिन्या , तर इतर क्षेत्रांशी संबंधित ६०० वाहिन्या आहेत. यात वृत्त , मनोरंजन , बिझनेससाठी वाहिलेले विशेष चॅनेल्स आहेत. टेलिव्हिजनच्या क्षेत्रामधील वाहिन्यांसोबतच रेडिओच्या एफएम वाहिन्यांनाही ' यंग टॅलेंट ' ची गरज असते. इलेक्ट्रॉनिक मीडियाविषयी युवकांनाही प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही बाबींचा व्यवस्थित मेळ घातल्यास या क्षेत्रातील एक चांगले करिअर नव्या पिढीसमोर खुले होऊ शकते.

आवश्यक कौशल्ये

या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी इंग्लिश , हिंदी , मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अशा संधींचं सोनं करण्यासाठी तांत्रिक कौशल्य , वाक्चातुर्य , सामान्य ज्ञान , राष्ट्रीय-आतंराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण करण्याची कला , प्रश्न विचारण्याचं कौशल्य , प्रभावी स्क्रिप्टिंग , न्यूज सेन्स , व्हिज्युअल नॉलेज यांची चांगली माहिती असणं गरजेचे आहे. ज्यांना पॉलिटिकल , फिल्म , क्राईम , बिझनेस इत्यादी विशिष्ट विषयांना वाहिलेल्या वाहिन्यांमध्ये काम करायची इच्छा आहे , त्यांना त्या-त्या क्षेत्राची किमान माहिती असणं आवश्यकच आहे.

आव्हानं 

टीव्ही पत्रकारिता हे एक उत्तम करिअर असले , तरी या क्षेत्रातील आव्हानेही तितकीच प्रबळ आहेत. या क्षेत्रात येणाऱ्यांकडे रिस्क घेण्याची तयारी असल्याशिवाय प्रगती होऊच शकत नाही. त्यामुळेच काही नवीन करून दाखवायची आणि आव्हानं स्वीकारायची तयारी असेल त्यांनीच या क्षेत्राचा विचार करणं सोयीचं ठरतं. त्यासाठीचं शिक्षण- प्रशिक्षण पुरविणाऱ्या विविध संस्थांमधून टीव्ही पत्रकारितेमधील पदवी , पदव्युत्तर डिप्लोमा आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. अशा संस्थेत प्रवेश घेताना न्यूजरूम , एडिट सूट , इन-हाउस प्रॉडक्शन , इन-हाउस पब्लिकेशन , व्याख्याते , प्रत्यक्ष टीव्हीमध्ये काम करणारे आणि त्या संस्थेमध्ये शिकविण्यासाठी उपलब्ध होणारे गेस्ट लेक्चरर , लायब्ररी , कॅसेट लायब्ररी , वेब लॅब इत्यादी बाबींविषयी माहिती करून घेणं आणि आपण प्रवेश घेत असलेल्या ठिकाणी या सर्व बाबींची उपलब्धता तपासून पाहाणे आवश्यक ठरतं. त्यासोबतच या अभ्यासक्रमांची मान्यता , त्याला परवानगी देणाऱ्या युनिव्हर्सिटीज आदी बाबींचीही चौकशी करावी.

संधी 

टीव्ही पत्रकारितेची पदवी असल्यास तुम्ही फ्री-लान्स म्हणजेच कोणत्याही विशिष्ट वाहिनीसाठी काम न करता सर्वांसाठी काम करणारी व्यक्ती म्हणूनही काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हिज्युअल एडिटिंगची चांगली माहिती असणं आवश्यक आहे. आज वृत्तवाहिन्या अनेक आउटडोअर प्रॉडक्शन हाऊसेसकडून फीचर बेस्ड , करंट अफेअर , टॉक शो , इंटरअॅक्टिव्ह बेस्ड प्रोग्रॅम्स तयार करून घेतात. सन २०२०पर्यंत भारतात टीव्ही चॅनेल्सच्या संख्येत भर पडणार असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता , टीव्ही पत्रकारिता हा एक चांगला करिअर पर्याय म्हणून नव्या पिढीने निश्चितच आजमावून पाहायला हवा.


गुरुवार, १८ जुलै, २०१३

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल



तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

शनिवार, १५ जून, २०१३

व्यवसाय की नोकरी ?


द्योग, व्यवसाय, धंदा किंवा मराठी समाजात अनेक समज, गैरसमज आहेत. त्यातील कित्येक गैरसमज तर पिढ्यान्‌पिढ्या पोसले गेले आहेत. ते दूर करणे आवश्‍यक आहे.

बिझनेस सुरू करायला मोठ्या प्रमाणावर भांडवल, म्हणजे पैसा लागतो; तसेच बराच अनुभव लागतो, बिझनेस करणारा माणूस "चार सौ बीस असला पाहिजे, त्याशिवाय त्याला बिझनेस जमूच शकत नाही, बिझनेस करायला फारशी अक्कल लागत नाही, या व अशा प्रकारच्या अनेक भ्रामक कल्पना मराठी समाजात आहेत. इतर समाजामध्ये बिझनेस करणे प्रतिष्ठितपणाचे समजले जाते. मराठी समाजामध्ये बिझनेस करणाऱ्या माणसाकडे संशयाने बघितले जाते. मराठी समाजात बिझनेसची प्रतिष्ठा काय दर्जाची आहे, याचा उत्तम अनुभव सदाशिव बोराटे यांना आला आहे. लग्नाच्या वेळी वधूपक्षाकडून विचारणा झाली, तेव्हा मुलगा बिझनेस करतो, नोकरी करत नाही असे सांगितल्यानंतर त्यांना कुणी मुलगी द्यायला तयार होत नव्हते. तीन वर्षे अथक प्रयत्न केल्यावर त्यांचे लग्न झाले. माझे दुसरे एक नारायणगावचे उद्योजकमित्र सुभाष झानपुरे यांचापण हाच अनुभव आहे. बी.कॉम.नंतर त्यांनी नोकरी न करता बिझनेस करायला सुरवात केली. त्यामुळे त्यांना लग्नासाठी मुलगी मिळेनाशी झाली. इतर समाजात बिझनेस करणाऱ्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. मराठी समाजात अशा घरात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. बिझनेसबल मराठी मनात ही जी काही "निगेटीव्हिटी' किंवा नकारात्मक भावना आहे, ती दूर करणे आवश्‍यक आहे. याचा परिणाम नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या मराठी तरुण-तरुणींवर होत असतो. त्यांच्यातील सकारात्मक विचारांना पावलोपावली ठेचा लागून त्यांच्यातील नकारात्मक प्रवृत्तीला खतपाणी मिळत जाते. अनेक मराठी व्यवसायक अयशस्वी होतात, त्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले आहे.

बिझनेससाठी मोठ्या प्रमाणावर पैसा किंवा भांडवल लागते हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांची गाडी भांडवलाशी अडते. भांडवल नाही, भांडवल मिळाले नाही. पुरेसे भांडवल नाही, कोणी भांडवल द्यायला तयार नाही, अशी कारणे पुढे करण्यात येतात. बिझनेससाठी तीन प्रकारच्या भांडवलाची गरज असते. पहिले म्हणजे पैशांचे भांडवल, दुसरे म्हणजे वेळेचे भांडवल व तिसरे म्हणजे मनुष्यकाळाचे भांडवल. यापैकी वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. या भांडवलाचा योग्य उपयोग केला, तर पैशांचे भांडवल आपोआप मिळत जाते. जगातील अनेक मोठ्या कंपन्या व औद्योगिक घराण्याची सुरवात अगदी छोट्या प्रमाणात व अत्यल्प भांडवलात झाली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाची सुरवात सायकलच्या दुकानापासून झाली. "रिलायन्स'ची सुरवात मुंबईतील एका चाळीतील भाड्याच्या एका खोलीतून झाली. "मायक्रोसॉफ्ट', "एच.पी.', "गुगल', "ऍपल' या कंपन्यांची सुरवात घराच्या गॅरेजमधून झाली, तर "डेली'ची सुरवात हॉस्टेलच्या डॉर्मेटरीतून झाली. "सोनी' या प्रख्यात जपानी कंपनीची सुरवात बॉंबहल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या तळघरातील 10 फूट स 10 फूट या छोट्या जागेतून झाली. दहा हजार रुपयांच्या अल्पशा भांडवलावर "इन्फोसिस'ची सुरवात पुण्यात दोन खोल्यांच्या जागेत झाली, तर "विप्रो'ची सुरवात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या छोट्या गावात झाली. केशवलक्ष्मी प्रसाधने (केप्र) ही पुण्यातील लोणची-मसाले बनविणारी एक प्रसिद्ध कंपनी. केवळ पाच रुपयांच्या भांडवलात त्याची सुरवात झाली. "वॉरन बफे'चे नाव जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीतील एक व सर्वांत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून घेतले जाते. केवळ शंभर डॉलरच्या भांडवलावर त्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली. या सगळ्यांनी आपल्याकडील वेळेच्या व मनुष्यकाळाच्या भांडवलाचा योग्य उपयोग केला, म्हणून त्यांना पैशांचे भांडवल मिळत गेले.
बिझनेससाठी अनुभवाची गरज असते, हा दुसरा मोठा गैरसमज आहे. उलट अनुभवाची गरज नसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे "सबत्वे सॅंडविच'. हा वर्षाला अब्जावधी डॉलरची उलाढाल असलेला जगातील सगळ्यात मोठा साखळी रेस्टॉरंटचा बिझनेस. फ्रेड डिल्युका या 17 वर्षांच्या शाळकरी मुलाने महाविद्यालयाची फी जमविण्यासाठी म्हणून या व्यवसायाला सुरवात केली. त्या वेळी फ्रेडला हॉटेलमध्ये जाऊन सॅंडविचेस खाल्ल्याशिवाय या बिझनेसचा दुसरा कोठलाही अनुभव नव्हता. त्याने जो काही अनुभव मिळवला, तो बिझनेसमधूनच तोसुद्धा चुका करत, ठेचा खात, शिकत आज त्यांची जगभर 21 हजारांवर रेस्टॉरंट आहेत. 275 प्रकारची सॅंडविचेस ते पुरवतात. त्याची पण सुरवात केवळ दोन हजार डॉलरच्या भांडवलावर झाली आहे. हे भांडवलसुद्धा फ्रेडच्या वडिलांच्या मित्राने पुरवले!
बिझनेससाठी लागणारा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे निर्णय घेण्याची व निर्णय राबविण्याची क्षमता. निर्णय चुकेल या भीतीपोटी अनेक जण निर्णय घेण्याचे टाळत तरी असतात किंवा चालढकल तरी करत असतात. तर बऱ्याच वेळा ही जबाबदारी इतरांवर सोपवली जाते. अनेक कुटुंबांमध्ये तरुणांमधील निर्णयक्षमता मारली जात असते. मुलांविषयीचे सर्व निर्णय पालक घेत असतात व मुलांना "होयबा' बनवून ठेवतात. ही "होयबा' मनोवृत्ती नोकरीसाठी ठीक असते; पण बिझनेससाठी नाही. बिझनेसमध्ये अनेक निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे लागतात. कधी कधी हे निर्णय घाई गडबडीत किंवा "ऑन द स्पॉट' घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने निर्णय घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. निर्णय चुकला तर त्यामुळे घाबरून जाऊ नये. एकदा निर्णय घेण्याची सवय लागली की अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपोआप निर्माण होते.
बिझनेससाठी लागते धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये व स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची लवचिकता, उत्तम व्यवहार यात व मार्केटिंगचे कौशल्य. यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही तरी गुण असतातच. जे लोक मार्केटमध्ये शिरण्याचे धाडस दाखवतात, मार्केटमध्ये उभे राहण्याची जिद्द दाखवतात व मार्केटमध्ये टिकून राहण्याचे कौशल्य दाखवतात त्यांचे बिझनेस सहसा कधी बुडत नसतात.
बिझनेससाठी अजून एका गोष्टीची आवश्‍यकता असते. ती म्हणजे धोका पत्करायची तयारी. मराठी समाजामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता फार कमी आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची सवय आहे किंवा अशा वातावरणाकडे ओढा आहे. जे सदैव सुरक्षित वातावरणात वावरत असतात. त्यांच्यात धोका पत्करण्याची मानसिकता नसते; पण आपण रोजच्या आयुष्यात, पावलोपावली अनेक धोक्‍यांना सामोरे जात असतो. घरातून कार्यालयात, महाविद्यालयात किंवा शाळेत जाण्यासाठी बाहेर पडतो. तेव्हा अपघाताचा धोका असतोच. हा धोका पत्करून आपण जातच असतो. हा धोका पत्करायचा नाही असे ठरवले, तर घरातच बसून राहावे लागेल. परीक्षेला जाताना परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचा धोका असतो, तसेच परीक्षेत पहिले येण्याचीपण शक्‍यता असते. अनुत्तीर्ण होण्याचा धोका पत्करून परीक्षेला बसले तर पहिले येता येते. त्यामुळे धोका हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. "नो रिस्क नो रिवॉर्ड' म्हणजे धोका पत्करल्याशिवाय फायदा मिळत नाही.
बिझनेसमध्ये "वाकेन, पण मोडणार नाही', हे वाक्‍य महत्त्वाचे ठरते. शिवचरित्राचा जर बारकाईने अभ्यास केला, तर शिवाजी महाराजांनी हे तंत्र वापरून व प्रसंगी पड खाऊन अनेक वेळा स्वराज्य वाचवले आहे. "अंथरूण बघून हात पाय पसरावेत', असे वाक्‍य शिकवले जाते. याचा अर्थ आपली ऐपत बघून उड्या माराव्यात; पण पांघरूण हवे तेवढे मोठे करता येते, हे शिकवले जात नाही! ते शिकवणे आता आवश्‍यक आहे. या ठिकाणी "अंथरूण' म्हणजे "आर्थिक पाया', जो हवा तेवढा मोठा करता येतो. "माणसाने अल्पसंतुष्ट असावे, मिळेल त्यात समाधान मानावे', असे शिकवले जाते. हा अल्पसंतुष्टपणा समाजासाठी घातक असतोच, पण बिझनेस करणाऱ्या माणसास फारच घातक असतो. मला आता जे मिळते आहे, यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे, या मनोवृत्तीनेच प्रगती होत असते. त्यामुळे बिझनेस करणाऱ्या माणसाने नेहमी "असंतुष्ट' असले पाहिजे. तो आता जे काही करतो आहे, त्यापेक्षा अधिक चांगले करण्याची इच्छा त्याने सदैव बाळगायला हवी. आता माझे पोट भरले आहे. आता अजून मिळविण्याची इच्छा नाही,' अशी भावना जेव्हा निर्माण होते. तेव्हा बिझनेसने "रिव्हर्स गिअर'मध्ये जायला सुरवात केली आहे. किंवा बिझनेसच्या अधोगतीला सुरवात झाली आहे असे खुशाल समजावे.
आर्थिक निरक्षरता हा मराठी माणसाचा फार मोठा दुर्गुण आहे. आर्थिक व्यवहार न समजणे, आर्थिक व्यवहार समजावून घेण्यामध्ये चालढकल करणे, हिशेब ठेवण्याची सवय नसणे, आर्थिक शिस्त नसणे, आर्थिक नियंत्रण नसणे, इतरांवर अतिविश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे ही सगळी आर्थिक निरक्षरतेची लक्षणे आहेत. बिझनेस हा शेवटी पैशांचा खेळ असतो व तो व्यवस्थित खेळता येणे आवश्‍यक असते. त्यामुळे आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे.
एकीमध्ये बळ असते. हे लक्षात ठेवावे. मृदू बोलणे हे कमजोरपणाचे लक्षण समजले जाते, तर कठोर बोलणे हे सक्षमपणाचे लक्षण समजले जाते. एक मृदू शब्द दहा माणसे जोडू शकतो, तर एक कठोर शब्द शंभर माणसे तोडू शकतो, हे लक्षात ठेवावे. या गोष्टी अमलात आणल्या तर उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात मराठी समाज स्वतःचे एक आगळेवेगळे व आदरणीय स्थान निर्माण करेल. पाहिजे फक्त प्रबळ इच्छाशक्ती, ईर्षा आणि महत्त्वाकांक्षा!
लेखक : उल्हास हरी जोशी

मंगळवार, २१ मे, २०१३

साऱ्या मित्रांचे लग्नानंतर असेच होते का?


खर म्हणजे आपण सारे सुखात जगत असतो
एका दुर्लभ क्षणी मित्राला एक चेहरा भेटतो
अक्कल गहाण पडते , भेजा कामातून जातो
उघड्या डोळ्यांनी आपला मित्र चक्क लग्न करतो

ह्या मित्राचे असली रूप मग आपल्याला कळत
नवरा नावच नवीन प्रकरण आपल्यापुढे येत
हा दारूण मनोभंग व्हायलाच पाहिजे का?
साऱ्या मित्रांचे लग्नानंतर असेच होते का?

रोज आपल्यात उठबस करणारा आता नजर चुकवू  लागतो
तासनतास पार्ट्यात रमणारा घड्याळ पाहू लागतो
आज सिनेमाला जाऊ तर घरी सासरे आलेले असतात
लोणावळ्याला जाऊन ऐश करू तर आधीच खूप खाडे असतात
मैत्रीची सारी नाती हे विसरतात का?
साऱ्या मित्रांचे लग्नानंतर असेच होते का?

सचिनची batting पाहून आम्ही टाळ्या पिटत असतो
वाण्याचे बिल पाहून हा डोकं धरून बसतो
गाड्या काढून आम्ही जेव्हा फिरायला जातो
हातात पिशव्या घेऊन हा रेशन घेऊन येतो
सिगारेटच्या धुरालाही हा महाग झालेला असतो
लग्नानंतर बायकोचा अगदी गुलाम झालेला असतो
साऱ्याच वाघांचा लग्नानंतर उंदीर होतो का?
साऱ्या मित्रांचे लग्नानंतर असेच होते का?

मित्र नेहमीच चांगला जेव्हा तो bachelor असतो
bachelor फारच चांगला कारण तो नवरा नसतो
प्रत्येक मित्राला ह्या सत्याचा साक्षात्कार होतो
फक्त हा बोध त्याला मित्राच्या लग्नानंतर होतो
अपवाद म्हणून सुद्धा याला अपवाद नाही का?
साऱ्या मित्रांचे लग्नानंतर असेच होते का?


Link: www.marathikavita.co.in

शनिवार, ४ मे, २०१३

अष्टविनायका तुझा



स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्‍नेश्वरं ओझरम्‌
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्‍नेश्वरं ओझरम्‌
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्‍तांनी असा

गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं घेतला वसा

गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सार्‍यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा

गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु कैटभानं गांजलं हे नगर
ईष्नुनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्‍याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा

गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा

गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्‍नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्‍नहारी इघ्‍नहर्ता स्वयंभू जसा

गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय्‌ भक्‍तिभाव 
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्‍ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा

सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्‍ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्‍न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्‍कम भिंती देवाच्या भक्‍तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा

मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्‍नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया


गीत-जगदीश खेबूडकर
संगीत-अनिल-अरुण
स्वर-अनुराधा पौडवाल,  जयवंत कुलकर्णी,  चंद्रशेखर गाडगीळ
  शरद जांभेकर,  मल्लेश
चित्रपट-अष्टविनायक (१९७९)

शनिवार, २० एप्रिल, २०१३

एकवार तरी राम दिसावा




हे श्रीरामा, हे श्रीरामा
एक आस मज एक विसावा
एकवार तरी राम दिसावा, राम दिसावा

मनात सलते जुनी आठवण
दिसतो नयना मरता श्रावण
पिता तयाचा दुबळा ब्राम्हण
शाप तयाचा पाश होऊनी आवळितो जीवा

पुत्रसौख्य या नाही भाळी
परि शेवटच्या अवघड वेळी
राममूर्ति मज दिसो सावळी
पुत्र नव्हे तो अंश विष्णूचा वरदाता व्हावा

मुकुट शिरावर कटि पीतांबर
वीर वेष तो शाम मनोहर
सवे जानकी सेवातत्पर
मेघःशामा, हे श्रीरामा, रूप मला दावा

गीत-ग. दि. माडगूळकर
संगीत-वसंत देसाई
स्वर-आशा भोसले
चित्रपट-मोलकरीण (१९६३)
राग-तोडी