बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

मला सांगा सूख म्हणजे

मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !

दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्‍नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं


गीत - श्रीरंग गोडबोले
संगीत - अशोक पत्की
स्वर - प्रशांत दामले
नाटक - एका लग्‍नाची गोष्ट
गीत प्रकार - नाट्यगीत

शनिवार, २३ जुलै, २०१६

फळे खा, आनंदात राहा.......





फळे व भाजीच्या प्रमाणापेक्षा आठपट जास्त फायदा त्यांच्या सेवनाने होतो. एखाद्या बेकार माणसापेक्षा नोकरी करणाऱ्या माणसाला जितके समाधान मिळेल तितके समाधान फळे आणि भाजी खाणाऱ्याला मिळते. वॉरविक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ अ‍ॅण्ड्रय़ू ऑस्वल्ड यांच्या मते, फळे व भाज्यांच्या सेवनाने जितके आरोग्य सुधारते तितक्यापटीहून आठपट अधिक तुमच्या आनंदी जीवनात भर पडते.

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

मीही सुंदर, तूही सुंदर

मीही सुंदर, तूही सुंदर, आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर नभ हे सुंदर जे जे दिसते ते ते सुंदर

निळेभोर हे आभाळ मोकळे
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले, अमृतरसाचे सांडती पाझर

धाव राधिके, धाव लौकरी
अनंतामध्ये मारू भरारी
आनंदाचे तुफान उठले, सर्वांगाला पंख उगवले
सुंदरतेचा पहा उसळला जिकडेतिकडे अथांग सागर


गीत - प्रल्हाद केशव अत्रे
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - पं. उदयराज गोडबोले
नाटक - अशी बायको हवी !

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

Whatsapp पीसी




हां हां म्हणता म्हणता, मोबाइलवरील सोशल मेसेजिंगचे सर्वाधिक पसंतीचे अ‍ॅप ठरलेल्या 'व्हॉट्सअ‍ॅप'ने जगभरात अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच फेसबुकने हे अ‍ॅप खरेदी केल्यापासून त्यात काही ठळक आणि उपयुक्त बदल होऊ लागले आहेत. अशातच आता 'व्हॉट्सअ‍ॅप' चक्क डेस्कटॉप संगणकांवरही येऊ घातले आहे. या पाश्र्वभूमीवर 'व्हॉट्सअ‍ॅप'चे डेस्कटॉपवरील येणे आणि त्याआधीपासून 'पीसी' आणि 'मोबाइल' अशा दोन्हीकडे संचार असलेले अ‍ॅप्लिकेशन्स यांचा घेतलेला आढावा..
जगभरातील संवादाचे सर्वात सहज आणि सर्वाधिक वापर असलेले मोबाइल अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने आपले स्थान मजबूत केले आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता (भारतात आता विनामूल्य) केवळ इंटरनेट डाटाच्या वापरातून एकाचवेळी अनेक लोकांशी संवाद साधण्याची संधी देणाऱ्या 'व्हॉट्सअ‍ॅप'ने मोबाइलमधील 'एसएमएस' 
सुविधा केवळ औपचारिकतेसाठी शिल्लक ठेवली आहे. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याउठल्या प्रत्येकाची नजर मोबाइलवरील 'व्हॉट्सअ‍ॅप' मेसेजेसवर जात नसेल तर नवलच. अशी किर्ती प्रस्थापित करणारे 'व्हॉट्सअ‍ॅप' आता लवकरच तुमच्या डेस्कटॉप संगणकांवरही येत आहे. 
'व्हॉट्सअ‍ॅप'चे स्पर्धक सोशल मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या 'टेलिग्राम'चे सहसंस्थापक पेवेल डुरोव्ह यांनी अलिकडेच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत 'व्हॉट्सअ‍ॅप' संगणकांवर येण्याच्या खटपटीत असल्याचा दावा केला. 'व्हॉट्सअ‍ॅप'च्या अँड्रॉइड फोनवरील नव्या अपडेटमध्ये 'व्हॉट्सअ‍ॅप वेब' नावाचा कोड असल्याचेही उघड झाले आहे. शिवाय या अपडेटमध्ये संगणकावरील 'लॉगइन लॉगआऊट' तसेच 'ऑनलाइन स्टेटस' यासंबंधीचे कोडही दिसून आले आहेत. या सर्व गोष्टींनी 'व्हॉट्सअ‍ॅप'ची डेस्कटॉप आवृत्ती लवकरच येण्याची शक्यता गडद केली आहे. अर्थात 'व्हॉट्सअ‍ॅप' किंवा त्याची मालक असलेल्या 'फेसबुक'कडून अद्याप यासंदर्भात कोणताही खुलासा वा घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, स्मार्टफोनवर स्वत:चे अधिराज्य निर्माण केल्यानंतर 'व्हॉट्सअ‍ॅप'चा मोर्चा टेबलावरील संगणकांकडे वळेल, यात शंका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आजघडीला तब्बल ६० कोटींहून अधिक वापरकर्ते असलेल्या 'व्हॉट्सअ‍ॅप'च्या वापरकर्त्यांची संख्या त्यामुळे अधिक वाढणार आहे. विशेष म्हणजे, 'व्हॉट्सअ‍ॅप' संगणकावर आल्यानंतर वापरकर्त्यांना मोठय़ा स्क्रीनवरून मोबाइलवर सोशल मेसेजिंग करणे शक्य होणार आहे.

'व्हॉट्सअ‍ॅप' पहिले नाही
मोबाइलवरून डेस्कटॉप संगणकावर अवतरणारे व्हॉट्सअ‍ॅप हे पहिले सोशल मेसेजिंग अ‍ॅप नाही. उलट 'व्हॉट्सअ‍ॅप'ला टक्कर देत असलेले टेलिग्राम, वायबर, वुई चॅट या अ‍ॅप्सनी आधीपासूनच संगणकीय रूपात वावरायला सुरुवात केली आहे. या तीन प्रमुख अ‍ॅप्सखेरीज आणखीही अनेक अ‍ॅप्स आहेत, जे संगणक आणि स्मार्टफोनवर काम करतात. अशाच काही अ‍ॅप्सविषयी:

वायबर
विंडोज, आयओएस, ओएसएक्स, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, नोकिया अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चालू शकणारे 'वायबर' आतापर्यंत २० कोटींहून अधिक वापरकर्त्यांच्या मोबाइलवर स्थानापन्न झाले आहे. 'व्हॉट्सअ‍ॅप'प्रमाणे वायबरदेखील मोबाइल क्रमांकाच्या आधारेच वापरता येते. यातून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्सची सुविधाही पुरवण्यात आली आहे. मात्र, संगणकावर इन्स्टॉल करण्यापूर्वी 'वायबर' मोबाइलवर 'इन्स्टॉल' करणे आवश्यक आहे.

टेलिग्राम
व्हॉट्सअ‍ॅपला चांगली टक्कर देणारे 'टेलिग्राम' बऱ्याच आधीपासून संगणकावर उपलब्ध आहे. 'एमटीप्रोटो' या डाटा प्रोटोकॉलवर आधारीत असलेल्या 'टेलिग्राम'चे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्यातील संदेशांची गोपनीयता आहे. एखाद्या व्यक्तिला पाठवलेला मेसेज ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करू शकत नाही आणि तो मेसेजही काही ठरावीक काळाने लूप्त होतो, हे टेलिग्रामचे वैशिष्टय़ अतिशय व्यक्तिगत संवादासाठी प्रचंड उपयुक्त आहे. याशिवाय आपले सामान्य संदेश 'टेलिग्राम' 'क्लाउड'वर स्टोअर करून ठेवत असल्याने आपल्या मोबाइलची स्पेस तुलनेने कमी वापरली जाते. 'क्लाउड'वरील डाटाही आपल्या गरजेनुसार काढून टाकता येतो.  

स्काइप
स्काइप हे सर्वात जुने सोशल मेसेजिंग अ‍ॅप असून आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. विशेषत: यातील व्हिडिओ कॉलिंगची सुविधा वापरकर्त्यांना अधिक आकर्षित करत असते. मात्र, स्काइपच्या एकूण इंटरफेसमध्ये अनेक त्रुटी आजही जाणवतात. त्यातील कॉन्टॅक्ट सर्च करताना होणारा विलंब तर वैतागवाणा आहे.

लाइन
आशियामध्ये आणि विशेषत: भारतात अधिक लोकप्रिय असलेल्या 'लाइन'चे २० कोटीच्या आसपास वापरकर्ते आहेत. यावरून व्हिडिओ, व्हॉइस, फोटो, स्टिकर्सची देवाणघेवाण करता येते. 'लाइन'चा लूक तरुणवर्गाला अधिक आकर्षित करणारा आहे.

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय.



अंधाराला घाबरत नाय, आभाळाची साथ हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

शब्दामध्ये गोडवा आमच्या, रक्तामध्ये इमानदारी,
बघत नसतो कधी आम्ही, किती कुणाची जहागीरदारी,
अरे भगव्या समोर महाराष्ट्रातच, मराठीचा धाक हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय....

हक्कासाठी भांडतोय आम्ही, नोकरीसाठी रडतोय,
महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास, पुन्हा घडतोय ,
हे नुसतेच तांडव नाही आमचे, अन्यायावर मात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

पुरे झाले आता तुमचे मराठीवर हल्ले,
बुरुजासकट  जागे करू माराष्ट्रातील किल्ले,
पाठीवरती अजून आमच्या, शूर शिवाचा हात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

स्मरण ठेवा तानाजीच, मरण आठवा संभाजीच,
स्वराज्यासाठी रक्त सांडला बाजीचा,
साल्यानी पाठीमागून वार केले, हाच मोठा घात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय.....

बुधवार, १७ डिसेंबर, २०१४

माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....

तलवारीची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कारटी ऊशिरा झोपली...
माहीत नाही शहाजीराजे कोण,जिजाऊ कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन....
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पिढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
माणसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता, पूजा करायचं पण App आलाय आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची, अन्
शुर गाथा शिवऱायानची .
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...
तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
वडील जिवंतपणिचं"डैड" झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
दिवसभर मुलगा CHATTING च नाही करत,
तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
दुध पाजणारी आई, जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....