सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय.



अंधाराला घाबरत नाय, आभाळाची साथ हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

शब्दामध्ये गोडवा आमच्या, रक्तामध्ये इमानदारी,
बघत नसतो कधी आम्ही, किती कुणाची जहागीरदारी,
अरे भगव्या समोर महाराष्ट्रातच, मराठीचा धाक हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय....

हक्कासाठी भांडतोय आम्ही, नोकरीसाठी रडतोय,
महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास, पुन्हा घडतोय ,
हे नुसतेच तांडव नाही आमचे, अन्यायावर मात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

पुरे झाले आता तुमचे मराठीवर हल्ले,
बुरुजासकट  जागे करू माराष्ट्रातील किल्ले,
पाठीवरती अजून आमच्या, शूर शिवाचा हात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

स्मरण ठेवा तानाजीच, मरण आठवा संभाजीच,
स्वराज्यासाठी रक्त सांडला बाजीचा,
साल्यानी पाठीमागून वार केले, हाच मोठा घात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा