गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

सचिन भवितव्याचा निर्णय घेणार नोव्हेंबरमध्ये



मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपण आत्ताच निवृत्तीचा विचार केला नसून भवितव्याबाबत नोव्हेंबर महिन्यात निर्णय घेऊ, असे जाहीर केले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सचिनने ही बाब स्पष्ट केली.
गेली २३ वर्षे आपल्या तडाखेबाज फलंदाजीने क्रिडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विक्रमवीर आता ३९ वर्षांचा झाला असून अनेक स्तरांतून त्याच्या निवृत्तीबद्दल आडाखे बांधले जात आहेत. सुनिल गावस्कर आणि मोहम्मद अझरुद्दीनसारख्या काही माजी खेळाडूंनीही सचिनच्या मैदानावरील हालचालींत आता पूर्वीची चपळाई राहिली नसल्याचे बोलून दाखवले आहे.
वाढत्या वयानुसार सर्वांच्याच हालचाली मंदावतात. पण जोपर्यंत आपण मैदानावर चांगली कामगिरी करू शकतो, तोवर खेळत राहण्याचा निर्धार सचिनने व्यक्त केला. तसेच तूर्तास निवृत्तीचा विचार मनात नाही. पण ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण पुरेशी चांगली कामगिरी करू शकत नाही तेव्ही आपण निवृत्ती जाहीर करू, असे सचिनने सांगितले. निवृत्तीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. मी एकेका मालिकेतील कामगिरीचा सध्या विचार करत आहे. पण नोव्हेंबरमध्ये एकंदर कामगिरीचा फेरआढावा घेऊन निर्णय घेईन, असे सचिनने स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा