बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

मला सांगा सूख म्हणजे

मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !

दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्‍नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं


गीत - श्रीरंग गोडबोले
संगीत - अशोक पत्की
स्वर - प्रशांत दामले
नाटक - एका लग्‍नाची गोष्ट
गीत प्रकार - नाट्यगीत

शनिवार, २३ जुलै, २०१६

फळे खा, आनंदात राहा.......





फळे व भाजीच्या प्रमाणापेक्षा आठपट जास्त फायदा त्यांच्या सेवनाने होतो. एखाद्या बेकार माणसापेक्षा नोकरी करणाऱ्या माणसाला जितके समाधान मिळेल तितके समाधान फळे आणि भाजी खाणाऱ्याला मिळते. वॉरविक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ अ‍ॅण्ड्रय़ू ऑस्वल्ड यांच्या मते, फळे व भाज्यांच्या सेवनाने जितके आरोग्य सुधारते तितक्यापटीहून आठपट अधिक तुमच्या आनंदी जीवनात भर पडते.