रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

मीही सुंदर, तूही सुंदर

मीही सुंदर, तूही सुंदर, आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर नभ हे सुंदर जे जे दिसते ते ते सुंदर

निळेभोर हे आभाळ मोकळे
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले, अमृतरसाचे सांडती पाझर

धाव राधिके, धाव लौकरी
अनंतामध्ये मारू भरारी
आनंदाचे तुफान उठले, सर्वांगाला पंख उगवले
सुंदरतेचा पहा उसळला जिकडेतिकडे अथांग सागर


गीत - प्रल्हाद केशव अत्रे
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - पं. उदयराज गोडबोले
नाटक - अशी बायको हवी !