शुक्रवार, ३० मे, २०१४

शिपिंग क्षेत्रातील संधी



शिपिंग लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधींची ओळख-
जहाजे नसती, तर अध्र्या जगातले व्यवहार ठप्प होतील. व्यापाराचे आकारमान आणि मूल्य लक्षात घेता जगभरातील ९० टक्क्य़ांहून अधिक व्यापार हा जहाजामार्गे होतो. जशी लोकसंख्या वाढते विकसनशील देशांची प्रगती होत जाते, तसतसा हा व्यापार वाढत जातो. आपल्या देशामध्ये, पंजाब इतर उत्पादन क्षेत्रांमधून जो माल व्यापारासाठी येतो, तो कंटेनर्समधून पाठवला जातो. त्यामुळे वाहतुकीचे लॉजिस्टिक्स हासुद्धा शिपिंगचा अविभाज्य घटक आहे.

भारताने २०२० सालापर्यंत १०० कोटी टन माल व्यापारासाठी पाठवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. आजमितीस आपण केवळ ६०० दशलक्ष टन इतकाच माल हाताळू शकतो. नजीकच्या भविष्यात मोठय़ा बंदरांची वाढ तसेच नवीन बंदरे विकसित करण्याची कामे हाती घेतली आहेत. गुजरातने खासगी बंदरे विकसित करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. यातील काही बंदरे, मोठय़ा सरकारी बंदरांपेक्षाही भव्य आहेत. महाराष्ट्रामध्येही रेड्डी (रायगड), रेवस, दिघी, जयगड, लवगाव आणि धमणकोळ इथे नवीन बंदरे विकसित होत आहेत. बऱ्याचशा किनारी राज्यांमध्येही खासगी बंदरे विकसित होत आहेत. आखाती देश, मध्यपूर्व दक्षिणपूर्व आशियामध्ये बंदर व्यवस्थापनाशी संबंधित कामे (नियोजन, एजन्सीची कामे, स्टिवेडोअरिंग .) बाहेरून आलेले तज्ज्ञ अधिकारी करतात. भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुभवामुळे इथे प्राधान्य दिले जाते. ही सर्व कामे व्यवस्थापनाशी संबंधित असल्यामुळे स्त्री-पुरुषांना समान संधी उपलब्ध आहेत.

बी.बी.. (शिपिंग लॉजिस्टिक्स)

शिपिंग लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये करिअरच्या अशा अमाप संधी उपलब्ध असूनही, या क्षेत्रामधील विशेष शिक्षण मात्र सहज उपलब्ध नाही. उद्योगधंद्यांना त्यासाठी बी.कॉम. एम.बी.. पदवीधर यांच्यावर अवलंबून राहावे लागते. वास्को--गामा, गोवा येथील एम..एस. कॉलेजने पुढाकार घेऊन बी.बी.. (शिपिंग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट) हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. मान्यताप्राप्त संस्थेच्या कुठल्याही शाखेतून (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा व्होकेशनल) बारावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करायला पात्र ठरू शकतात. हा पदवी अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाशी संलग्न असून 'यूजीसी'च्या (विद्यापीठ अनुदान आयोग) 'इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री रिलेटेड प्रोग्राम्स' या योजनेखाली निवडला गेला आहे. शिपिंग क्षेत्रातील बहुतेक अभ्यासक्रम तांत्रिक स्वरूपाचे असतात. हा आगळावेगळा अभ्यासक्रम मात्र शिपिंग व्यवस्थापनाशी संबंधित आहे.

या अभ्यासक्रमामध्ये शिपिंग व्यवस्थापन लॉजिस्टिक्सशी संबंधित अनेक विषय शिकवले जातात. उदा. बंदर एजन्सी व्यवस्थापन, मेरिटाइम लॉ, मेरिटाइम इन्शुरन्स, चार्टरिंग, संगणक व्यवस्थापन . याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रातील वित्त मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, उत्पादन व्यवस्थापन असे अनेक विषयही शिकवले जातात. शिकवण्याची अनोखी पद्धत विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी प्रशिक्षित करते. अधिक माहिती www.beamsgoa.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

करिअरच्या संधी

ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणि परदेशातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदा. हे पदवीधर बंदरे, शिप ब्रोकर्स, फ्रेट फॉर्वर्डिग कंपन्या, शिपिंग लॉ कन्सल्टंट, एअर कार्गो, आयात-निर्यात कंपन्या, मरीन इन्शुरन्स कंपन्या, लॉजिस्टिक्स रीटेल क्षेत्र . ठिकाणी काम करू शकतात. या क्षेत्राची व्याप्ती यातील अनेक संधी यांचा विचार केला तर अशासारखे अनेक अभ्यासक्रम सुरू करण्याची आज गरज आहे, असे म्हणावे लागेल. आपल्या देशामध्ये मेरिटाइम लॉमेरिटाइम इन्शुरन्स, ब्रोकरेज, चार्टरिंग संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाच्या संधीही उपलब्ध नाहीत. आपण अजूनही त्यासाठी इंग्लंडवर किंवा तिथे शिकून आलेल्या मोजक्याच तज्ज्ञांवर अवलंबून आहोत. तेल प्रदूषण, अपघात . अनेक बाबींसाठी भारतीय विमा कंपन्याच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला परदेशी सेवांवर अवलंबून राहावे लागते. चेन्नई येथील इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने या संदर्भात काही ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.नजिकच्या भविष्यात यासंदर्भातील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच संशोधनातील संधी विद्यार्थ्यांना  उपलब्ध झाल्या तर या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात भर पडेल, हे निश्चित.


For Details :  http://www.loksatta.com/career-vrutant-news/opportunities-in-shipping-551358/

शुक्रवार, १६ मे, २०१४

आयुष्याची वाट



आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी,
केला घात की लागे माती काळी।
वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।१।।

अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन वाट चालताना।।२।।

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।३।।

जगण्याची वाट थोडी अवघड असते,
कधी सखोल तर कधी नागमोडी वळते।
वळताना जगण्याची रितही कळते,
आपन नसलो तरी वाटही जगते।।४।।

'वाट' लागण्यात सुध्धा
'वाटे'चीच बाजी।
चुकली 'वाट' तरी
'वाटे'चीच बाजी।।५।।

↝↝S. More↜↜