शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

प्रयत्न

प्रयत्नांना पर्याय नाही
आडवाट नाही; पळवाट नाही
प्रयत्न ही एक प्रक्रिया आहे..
प्रतिष्ठा असो वा धन,
यश असो वा सन्मान,
कौशल्य असो वा ज्ञान,
प्रयत्नांशिवाय प्राप्ती नाही.
प्रयत्नांशिवाय पात्रता नाही.
मुंगी जे खाद्य घेऊन वावरते
ते तिच्या अंदाजे आठपट असतं,
सुगरणीचा खोपा वा कोळ्याचं घर
आपल्यासाठी नवल असतं..
अंगभूत कौशल्य असतंच, मात्र
त्यात पारंगत बनण्यासाठी;
किंवा साध्य प्राप्त करण्यासाठी
प्रयत्नांमध्ये सातत्य हवं..
नियोजन, शिस्त नि लक्ष्य हवं.
स्वत:च्या क्षमता नि वेगळेपण
प्रयत्नांशिवाय कळत नाही,
कृतीतून अनुभवल्याशिवाय
शहाणपण काही मिळत नाही.
प्रयत्न करणाऱ्यांसाठी कठीण
वा अशक्य असं काही नसतं,
धडपडणाऱ्या मनामनांत
'कोलंबसचं गीत' प्रेरणा असतं.
ग्रहांच्या अपेक्षित फलापेक्षा
प्रयत्नांचा 'निग्रह' अधिक हवा.
आकाशाला कवेत घेण्यासाठी
प्रयत्नांवरच भरवसा असावा.
'काय करू नये' ठरवलं की,
स्वत:ला आपसूक गवसत जातो.
चुकत माकत चकचकीत होत
माणूस म्हणून घडत राहतो................................

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

स्वस्तात मस्त फोनची दुनिया............



मोबाइल घ्यायचा म्हटलं की त्याच्या स्पेसिफिकेशन्सच्याही आधी आपण आपले बजेट ठरवतो आणि मग त्यानुसार मोबाइलची निवड करीत असतो. असे करत असताना आपल्याला परवडणाऱ्या मोबाइल्सची यादीच आपल्यासमोर येते. पण त्याचा ब्रँड नावाजलेला नसतो. अशावेळी आपल्या मनात धस्स होतं आणि हा फोन घ्यायचा की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. फोन्सची निवड करत असताना काय काळजी घ्यायची, ते काही पर्याय आज आपण पाहू या.
भारतात मोबाइलचा वापर वाढत आहे हे काही नव्याने सांगणे गरजेचे नाही. पण यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे अनेक भारतीय कंपन्या मोबाइल उत्पादन क्षेत्रात उतरल्या. याचा फायदा असा झाला की मोबाइलच्या किमती कमी झाल्या. यामुळे सामन्यांच्या खिशातही जास्त सुविधा असलेला मोबाइल दिसू लागला. आंतरराष्ट्रीय माहिती मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार भारतीय ब्रँडची विक्री गेल्या वर्षांत कमालीची वाढली आहे. भारतीय कंपन्या मायक्रोमॅक्स आणि कार्बन यांनी सन २०१३ मध्ये मोबाइल मार्केटमध्ये ३२ टक्के आपला वाटा नोंदविला आहे. यामुळे बडय़ा कंपन्यांच्या स्थानाला काही धक्का बसला नसला तरी त्यांची विक्री मात्र कमी झाली आहे. याच भारतीय कंपन्या येत्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस मध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मायक्रोमॅक्सच्या कॅन्व्हास एचडीमध्ये मिळतात. याची किंमत १५ हजापर्यंत असल्यामुळे जास्त सुविधा आणि कमी पसे अशी गणिते असलेले ग्राहक मायक्रोमॅक्सचा पर्याय स्वीकारतात. यामध्ये सध्या कार्बन, लावा, इंटेक्स, आयबॉल, झोलो, सेलकोन, जोश अशा कंपन्याही बाजारात आल्या आहेत. त्यांचेही विविध फोन मार्केटमध्ये येत असल्यामुळे अनेकांना ते पर्यायही योग्य वाटत आहेत. हे सर्व पर्याय चिनी मोबाइलपेक्षा चांगले असतात. या कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात अगदी तीन ते चार हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामुळे सध्या आपल्यला स्वस्त आणि मस्त असे फोन उपलब्ध झाले आहेत.
भारतीय बाजारपेठ ही किमतीवर चालणारी आहे. हे लक्षात घेऊन भारतीय कंपन्यांनी चांगल्या सुविधा असलेले मोबाइल स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. हे मोबाइल स्वस्त आहेत म्हणून ते चांगले नाहीत असा अनेकांचा समाज असतो. हे काही प्रमाणात सत्य असले तरी ज्यांना जास्त पसे खर्च करावयाचे नसतील त्यांच्यासाठी हे पर्याय अगदी वाईटही ठरत नाहीत. या कंपन्यांचे फोन २० हजार रुपयांत आपल्याला ४० हजार रुपयांचा फोन वापरात असल्याचे भासवतात. म्हणजे तशा ९९ टक्के सुविधा या फोन्समध्ये असतात.

स्मार्टफोन घेताना कोणती काळजी घ्याल-
तुम्ही कोणत्याही कंपनीचे स्मार्टफोन घेत असाल तेव्हा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात जर तुम्ही स्वस्त फोन घेत असाल आणि तुमच्या मनात शेकडो प्रश्न पडत असतील तर तुम्ही खालील गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
स्क्रीनचा दर्जा- स्मार्टफोन घेताना तुम्ही स्क्रीनचा दर्जा तपासणे नक्कीच योग्य ठरेल. यामध्ये स्क्रीनचा आकार किमान तीन ते चार इंच इतका असावा. त्याचे रिझोल्यूशन किमान ३२० गुणिले ४८० इतके असावे. ही स्क्रीन फोटो पाहण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी तशी योग्य नसते. यामुळे तुम्हाला बजेट वाढविणे शक्य असेल तर स्क्रीनचे रिझोल्यूशन हे किमान ४८० गुणिले ८०० इतके असावे.
प्रोसेसरचा दर्जा - स्वस्त मोबाइलमध्ये प्रोसेसर कमी क्षमतेचे असतात. यामुळे त्याची क्षमता तपासून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये बहुतांश वेळा एक गिगाहर्टझचा सिंगल कोर प्रोसेसर असतो. यामुळे फोन स्लो होणे किंवा काम करताना बंद पडणे असे प्रकार होतात. यामुळे फोन घेताना किमान डय़ुएल कोर असणे गरजेचे आहे. यामुळे फोन चांगल्या प्रकारे चालू शकतो.
कॅमेरा- फोनमध्ये किमान पाच मेगापिक्सेल कॅमेरा असावा. यामध्ये एलईडी फ्लश असावा. यामुळे तुम्हाला फोनमध्ये चांगले फोटो आणि व्हिडीओ आपण रेकॉर्ड करू शकतो. काही फोन एचडी कॅमेरा देतात. पण हे कॅमेरे व्हीएजी रेझोल्यूशनवर आधारित असतात. काही फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असतो. याद्वारे तुम्ही व्हिडीओ कॉल्स करू शकतात.
ऑपरेटिंग सिस्टीम- अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोनच सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे फोनमध्ये . ओएस असलेलेच फोन विकत घ्या. जर तसे झाले नाही तर तुम्हाला नवीन अप्स वापरणे शक्य होणार नाही. िवडोज वर आधारित स्वस्त फोन शक्यतो विकत घेऊ नका.
सेवा केंद्रांची यादी- हे फोन घेतल्यावर आपल्या जवळील सेवा केंद्रांची यादी जरूर घ्या. या कंपन्या नवीन असल्यामुळे त्यातील बहुतांश कंपन्याचे सेवाकेंद्र सर्वत्र उपलब्ध नाही आहेत. यामुळे याबाबत जागरूक राहणे अधिक फायद्याचे ठरेल.
फोन्सचे काही पर्याय
इंटेक्स 'ॅक्वा ऑक्टा'
स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची एक कॉमन तक्रार आहे, ती बॅटरी लाइफबद्दल.. इंटरनेट, व्हॉट्स ॅपमुळे बॅटरी झपाझप संपते आणि दिवसातून दोन वेळा चार्ज करूनही ती पुरत नाही. सगळ्यांचीच ही ओरड ऐकल्यानंतर, बॅटरी जास्त काळ टिकावी या दृष्टीनं इंटेक्सनं आपल्या 'ॅक्वा ऑक्टा'मध्ये सुसज्ज यंत्रणा बसवली आहे. . गिगाहर्ट्झ एमटी ६५९२ ऑक्टा कोअर चिपसेट आणि दोन जीबी रॅममुळे हा फोन सुस्साट वेगानं चालेल, असा कंपनीचा दावा आहे. त्यात अँड्रॉइड . जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेय. दोन सिमच्या या मोबाइलची स्क्रीन सहा इंची असून वजन १८० ग्रॅम आहे. २३०० बॅटरीच्या जोरावर हा फोन सहा तासांचा टॉक टाइम आणि १८० तासांच्या स्टँडबायची खात्री देतो. 'ॅक्वा ऑक्टा'मध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज क्षमता १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
किंमत- १९, ९९९
मायक्रोमॅक्स कॅन्व्हास
या फोनमध्ये आपल्याला सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असून त्याचं स्क्रीन पाच इंचांचा आहे. इतकेच नव्हे तर त्याचा प्रोसेसर क्वाड कोर आहे. यामध्ये आपल्याला एचडी व्हर्जनही उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये 'ब्ल्वो टू अनलोक' आणि 'स्मार्ट पॉज व्हाईल वॉचिंग व्हिडीओ' असे नवे पर्याय देण्यात आले आहेत. याचा कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे. या सिरीजमध्ये आपल्याला ९६९० पासून ते १७ हजापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कार्बन टिटानियम
या कंपनीनेही स्मार्टफोन बाजारात आणले असून ते . इंच डिस्प्लेचे आहेत. हे डिस्प्ले पूर्णत एचडी असे आहेत. यामध्ये क्वाड कोर प्रोसेसर वापरण्यात आला असून कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंग गालाक्सी मेगाला चांगला पर्याय ठरू शकतो. याची किंमत १९९९० इतकी आहे. यामध्ये आणखी स्वस्त फोनही उपलब्ध आहेत.