गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

वनऔषधी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी



 अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. अशोकाचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधाबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते. शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होण्यास मदत होते. ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात. सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते. दूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. १० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.