रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

भारताचे सर्व राष्ट्रपती

1. राजेंद्र प्रसाद ( Jan 26, 1950-May 13, 1962) : भारतचे पहिले राष्ट्रपती, एकमेव राष्ट्रपती दोन टर्म पूर्ण करणारे.

2. एस. राधाकृष्ण (May 13, 1962-May 13, 1967) : धर्म आणि सिद्धांताविषयी ज्ञान असणारे हुशार व्यक्ती, त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून पूर्ण साजरा केला जातो. 

3. झाकीर हुसैन (May 13, 1967-May 3, 1969) : शिक्षाविशारद् हुसैन त्यांचा कार्यकाल संपूर्ण होण्या अगोदरच मरण पावले.  

4. वी. वी . गिरी (Aug 24, 1969-Aug 24, 1974) : एक हुशार व्यक्ती ज्यांनी राष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणूच काम केले .  

5. फाख्रुद्दिन आली अह्मेद Ahmed (Aug 24, 1974-Feb 11, 1977) : यांनी इंदिरा गांधीच्या आणीबाणी घोषणेवर सही केल्या होत्या. ते देखील त्यांचा कार्यकाल संपूर्ण होण्या आगोदर मरण पावले .

6. नीलम संजीव रेड्डी (July 25, 1977-July 25, 1982) : काँग्रेसनी मतदान केल्यानंतर राष्ट्रपती झाले.  

7. गींनी झैल सिंघ (July 25, 1982-July 25, 1987) : यांच्या कार्यकाळात इंदिरा गांधीची हत्या झाली . 

8. आर. वेंकटरमण (July 25, 1987-July 25, 1992) : गांधी कुटुंब हे राज्य करते होते. ते स्वतंत्र भारताच्या अस्थायी संसदेचे घटक होते .

9. शंकर दयाळ शर्मा (July 25, 1992-July 25, 1997) : एक उपराष्ट्रपती ज्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली.  

10. के. आर. नारायणन (July 25, 1997-July 25, 2002) : थायलंड, तर्की, चीन आणि अमेरिका या देशांचे राजदूत म्हणून काम केलेले नारायणन यांनी अर्थशास्त्र हे हरोल्द  लास्की यांच्याकडून शिकले होते.

11. ए. पी. जे. अब्दुल कलम (July 25, 2002-July 25, 2007) : भारतच्या  प्रक्षेपणास्त्र आणि परमाणु अस्त्र यांच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण भूमिका .

12. प्रतिभा पाटील (July 25, 2007- 2012) : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती .

13. प्रणब मुखर्जी (2012 - ) : चार दशके राजकारणात घालवणारे प्रणवदा यांची राष्ट्रपती म्हणून निवड याचवर्षी झाली.
 

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

Out dated झालंय आयुष्य

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय

दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................